मोरगाव (बारामती) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील मयुरेश्वराचे दर्शन घेतले आणि अभिषेक -पूजा व श्रींची आरती केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यानिमित्त आल्या होत्या. त्यांनी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जनरिक मेडिक मेडिकलला भेट दिली. यानंतर मयुरेश्वर मंदिरामध्ये येऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, कांचन कुल, अंकिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप आप्पा खैरे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, राहुल शेवाळे, जालींधर कामठे, रविंद्र साळवे आदी उपस्थित होते.
मयुरेश्वर मंदिरात आल्यानंतर महिलांनी त्यांचे औक्षण केले. येथील पुजारी मंडळींनी मंत्रोपचाराचे पठण करीत अभिषेक- पूजा व श्रींची आरती केली. मयुरेश्वर मंदिराच्या पुरातनतेविषयी व येथील व्यवस्थापना संदर्भात त्यांनी माहीती घेतली. श्रींच्या अभीषेक पूजेनंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त विनोद पवार यांनी निर्मला सितारामण यांचा शाल, श्रींची प्रतिमा, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.