पुणे – बाणेर रोड येथील भैरवी हॉटेलमध्ये आषाढ़ी एकादशी निमित्त कामगारांचा सोबत वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आला. आषाढ़ी एकादशी निमित्त हॉटेलमधील सर्व पुरुष मंडळीने पंढरपूरच्या वारीतील वारकऱ्यांप्रमाणे धोतर बंडी, डोक्यावर टोपी असा गणवेश परिधान केला होता.
तर सर्व महिला वर्गाने नऊवारी साड़ी डोक्यावर तूळस घेऊन महाराष्ट्रीय गणवेश परिधान केला होता. यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात हॉटेलच्या परिसरात पालखी काढण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी फुगड़ी खेळली व सर्वाणी भजन – कीर्तनचा आनंद घेतला.
त्यानंतर हॉटेल मध्ये काम करणारे कर्मचारी संजय स्वामी व त्यांच्या पत्नी यांच्या विठुरायाची पुजा करण्यात आली. यावेळी कामगार व ग्राहक यांच्यासाठी हॉटेल तर्फे साबुदाना वडा, खिचड़ी, वरईचा भात,भाकरी आमटी , उपवासाचे थालीपीठ , उपवासाची थाळी , असे उपवासाचे पदार्थ कामगार व ग्राहकांना देण्यात आले.
दरम्यान, स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल अँण्ड रिसॉर्ट चे संस्थापक सर्वेसर्वा रामदास (भाऊ) मुरकुटे व हॉटेल भैरवीचे संचालक विश्वास रामदास मुरकुटे यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत ते म्हणाले, सध्या कोरोना महामारीचे जे संकट आहे त्यात जास्त नुक़सान हॉटेल व्यवसायाचे झाले आहे. तरी यातून थोड़ा विसर पडावा तसेच कामगारांचे मनोधैर्य वाढ़ावे यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. बाणेर माज़ी नगरसेवक व योगीराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर तापकिर व श्रीराम समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय तापकिर उपस्तिथ होते,