बीड – बीड शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथिल प्रेमी युगुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून बीड मधील उत्रेश्वर पिंपरी हे प्रेमी युगुल आले होते.
आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी आत्महत्या करणाऱ्या मृतांची नावे आहेत. या दोघांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने हे केली हे अद्याप समजू शकले नाही.
आकाशचे घराशेजारी राहत असलेल्या दोन मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री उत्रेश्वर पिंपरी येथे आले. दरम्यान, मंगळवारी आकाश घराबाहेर गेल्यानंतर सावित्रीने घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याच रात्री आकाशने ही घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे आणि बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढिल तपास पोलिस करीत आहेत.