पुणे- करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी केवळ कोवॅक्सिन’ डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सहा केंद्रांवर मिळतील. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना सोमवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 20 जूनला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना सोमवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
कोवॅक्सिनचे डोस मिळण्याची केंद्रे –
1) येरवडा- राजीव गांधी रुग्णालय, 2) कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना, 3) कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना, 4) गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना, 5) महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना, 6) ससून सर्वोपचार रुग्णालय.