पुणे – एका विवाहितेला फेसबुक फ्रेंडने ब्लॅकमेल करत तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केली. संबंधीत व्यक्तीने विवाहितेवर बलात्कार करत त्याचे चित्रीकरण केले होते. याचे फोटो व व्हिडिओ त्याच्याकडे होते. ते देण्याच्या बदल्यात तो पैशाची मागणी करत होता.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (34,रा. पटियाला, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 34 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपीने फिर्यादीसोबत फेसबुक मेसेंजरव्दारे संपर्क साधला होता. त्यांची ओळख वाढल्यानंतर तो पटीयालावरुन पुण्यात तीला भेटायला आला होता. तेथे त्याने तीच्या सदनिकेत तीला सरबतातून गुंगीचे औषध दिले. ती गुंगीत असल्यावर तीच्यावर बलात्कार केला. याचे फोटो आणी व्हिडिओ शुटींग त्याने करुन ठेवले होते. तसेच तीचे मंगळसूत्रही त्याने काढून घेतले होते. हे फोटो व शुटींग त्याने स्वत:च्या स्टेटसला ठेवले होते.
मंगळसूत्र, फाटो व व्हिडिओ शुटींग परत देण्याच्या बदल्यात त्याने तीला एक कोटीच्या रकमेची मागणी केली होती. यासाठी तो वारंवार फोन, मेसेज व व्हिडिओ कॉल करुन तीला धमकी देत होता. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड करत आहेत.