पुणे( प्रतिनिधी) – करोनामुळे रखडलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज उद्या (दि. 10) सुरू राहणार आहे.
नेहमी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कामकाज बंद असते. मात्र, उद्या सकाळी 11 ते दुपारी दीड तर कार्यालयीन कामकाज दुपारी दोन पर्यंत पार सुरू राहणार आहे, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज एका सत्रात सुरू आहे. उद्याही तसेच सुरू राहणार आहे.