पुणे(प्रतिनिधी) – इथोपिया देशात 10 ते 15 टेस्ट ट्युब बेबी सेंटर असल्याचे सांगत दाम्पत्याने एकाला तेथील मेडीकलचे लायसन्स मिळवून देण्यासाठी लाखांचा गंडा घातला. ही घटना 2018 ते जुलै 2021 कालावधीत बोपोडीत घडली.
याप्रकरणी सोमेंद्र सारस्वत (वय 43) आणि नेहा सारस्वत (दोघेही रा. जयरास कॉप्लेक्स, बोपोडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केदार गणला (वय 52, रा. मुंबई ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
केदार आणि सारस्वत दाम्पत्याची मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दाम्पत्याने केदार यांना इथोपिया देशातील कॉन्सलेट यांच्यासोबत ओळख असल्याचे सांगितले. त्याशिवाय तेथील देशातील मेडीकल आणि लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून 20 लाख रूपये आरटीजीएस पद्धतीने घेतले.
त्यानंतर काही दिवसांनी 10 लाख रूपये घेतले. मात्र, 2018 पासून जुलै 2021 पर्यंत सारस्वत दाम्पत्याने त्यांना इथोपिया देशातील मेडीकलचे लायसन्स मिळवून दिले नाही. त्यानंतर केदार यांनी त्यांच्याकडे रक्कम मागितली असता, सारस्वत दाम्पत्याने त्यांना धनादेश दिला. मात्र, त्यांनी दिलेला धनादेश वठला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केदार यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तांबे तपास करीत आहेत.