मुंबई – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री यामी गौतम हिला चौकशीसाठी समन्स बजावले असल्याची घटना ताजी असताना आज अभिनेता डिनो मोरियाची मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीने अभिनेत्याची अकील संपत्ती जप्त केली आहे.
Enforcement Directorate has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, the total attachment reached to Rs 14,521.80 Crore. pic.twitter.com/8SEPTxCRZf
— ED (@dir_ed) July 2, 2021
काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
या कारवाईमध्ये ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त केली आहे. यांच्या संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचे ईडीने आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यामध्ये आठ मालमत्ता, तीन वाहने आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे.
स्टर्लिंग बायोटेक बँकेच्या फसवणूकीचा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. 14 हजार 500 कोटी रुपयांचे बँक घोटाळ्यातील आरोपी आणि गुजरातचे बिजनेसमन संदेसरा बंधु यांच्यासोबत या तिघांचे कनेक्शन असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.