ट्रॅफिक जॅमला आता बाय बाय करण्याची वेळ आली आहे. कारण आता उडणारी कार आली आहे. कारण या उडणाऱ्या कारची 35 मिनिटांची चाचणी यशस्वी झाली आहे.
हायब्रिड कार एअरक्राफ्टला बीएमडब्ल्यूचं इंजीन अशी या कारची रचना आहे. ही कार पेट्रोलवर धावू शकते. 8 हजार 200 फूट उंचीवर उडण्याची या कारची क्षमता आहे. तर एक हजार किमीचा प्रवास ही उडणारी कार करू शकते.
अवघ्या सव्वा दोन मिनिटात या कारचं उडणाऱ्या कारमध्ये रुपांतर होतं. जवळपास 40 तास ही कार हवेत राहू शकते. दोन जण या उडणाऱ्या कारमधून प्रवास करू शकतात. 170 प्रति किमी तास वेगाने ही उडणारी कार जाऊ शकते.
हॉलिवूड अभिनेता रॉबिन विलियम्स यांचा चित्रपट “फ्लबर’मध्ये “हवेत उडणाऱ्या कार’चे दृश्य दाखविण्यात आले. त्यानंतर अनेकांना असे वाटले की, जशी रस्त्यावर कार धावते तशीच कार हवेतही उडणारी हवी.
वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या अनेक वाहनचालकांना या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता वाहतूककांडीची अडचण दूर होणार, अशी शक्यता दियते. या उडणाऱ्या कारची यशस्वी चाचणीही झाली आहे त्यामुळे फ्लाइंग कारचं स्वप्न सत्यात उतरले आहे.