रोटरीचे अध्यक्ष संजीव कुमार पाटील यांची माहिती
वाघोली : हरित दिनानिमित्त वाघोली तालुका हवेली येथे रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती वाघोली रोटरी क्लबचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ वाघोली , वाघोली हाऊसिंग सोसायटीज असोसिएशन , ग्रीन सनराईज हिल्स यांनी पुढाकार घेतला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव यांच्या सहकार्याने वाघेश्वर तलाव सीमा भिंत आणि नगर रस्ता यामधील जागेत,वाघेश्वर मंदिर परिसर यामध्ये भारतीय प्रजातीची वड, पिंपळ, कडुलिंब, करंजा, बकुळ, चिंच , कांचन आदी १०० रोपे लावण्यात आली.
याप्रसंगी वाघोली रोटरी क्लबच्या अध्यक्ष संजीव कुमार पाटील, उपाध्यक्ष सिराज डोकाडीया, अजय परदेशी, किरण मानकावले, गुरुदास शेट्टी, गिरीश मेहतांनी, विद्या चव्हाण, ऋचा जैन, नितिन सूर्यवंशी, श्रीराम अंबड, रणजित सिन्हा, जसमीनदर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.