पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सकाळी आणि सायंकाळी व्यायायामासाठी आणि फिरायला जाणाऱ्या नागरिकांना शुल्क भरून सदस्यत्व घ्यावे लागणार असल्याचे परिपत्रक काल विद्यापीठ प्रशासनाने प्रसिध्द केले होते. त्यास विद्यार्थी संघटनेने जोरदार विरोध केला होता.
दरम्यान विद्यापीठाने परिपत्रक मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. दरम्यान हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'एसपीपीयू ऑक्सी पार्क'या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असून लवकरचं स्थगितीचे परिपत्रक निघेल.
— Uday Samant (@samant_uday) June 12, 2021
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एसपीपीयू ऑक्सी पार्क’या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असून लवकरचं स्थगितीचे परिपत्रक निघेल. असे उदय सामंत यांनी सांगितले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एसपीपीयू ऑक्सि पार्क’ या योजनेअंतर्गत विद्यापीठात व्यायामाला, फिरायला जाणाऱ्या दर महिना एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, शुल्क भरून सदस्यत्व घेणाऱ्यांना विद्यापीठाकडून विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे काल जाहिर केले होते.
यामध्ये ‘एसपीपीयू ऑक्सि पार्क ’ या योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या आवारात व्यायामासाठी आणि फिरायला जाणाऱ्या नागरिकांसाठी सदस्यत्वाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार मासिक शुल्क १हजार रुपये, सहामाही शुल्क साडेपाच हजार रुपये आणि वार्षिक शुल्क १० हजार रुपये भरून सदस्यत्व घ्यावे लागेल. सदस्यत्वाचे ओळखपत्र विद्यापीठाकडून दिले जाईल.
९ ते १६ वयोगटातील मुलांना सदस्यत्व शुल्क नसून, नोंदणी आणि ओळखपत्रासाठी पाचशे रुपये भरावे लागतील. अल्प उत्पन्न गटासाठी ५० टक्के सवलत दिली जाईल. स्वसाक्षांकित प्रमाणपत्र देणाºया दिव्यांग व्यक्तींना विनाशुल्क प्रवेश दिला जाईल. पहाटे साडेचार ते सकाळी आठ, सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत नागरिकांना त्यांचे सदस्यत्वाचे ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जाईल.
एसपीपीयू ऑक्सि पार्क च्या सदस्यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, खुली व्यायामशाळा, विद्यापीठातील क्रीडा सुविधांमध्ये सवलत, जयकर ग्रंथालयाच्या सदस्यत्व शुल्कात सवलत आदी सुविधा दिल्या जाणार असल्याचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले होते.