नवी दिल्ली – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 152 रुपयाने कमी होऊन 48,107 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 540 रुपयांनी कमी होऊन 69,925 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,883 डॉलर व चांदीचा दर 27.25 डॉलर प्रति औंस झाला. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्याबरोबर सोन्याचे सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात घट होत आहे.
अमेरिकन कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. त्याचबरोबर डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे अँजेल ब्रोकिंगचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.