नवी दिल्ली – सरकार ने एलपीजी सिलेंडर बाबत थोडा दिलासा दिला आहे. 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहेत. 122 रुपयांनी हे सिलेंडर स्वस्त करण्यात आले असून हे नवीन दर आजपासून म्हणजेच 1 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. याआधी 1 मे रोजी या सिलेंडरचे भाव 45.50 रुपयांनी कमी करण्यात आले होते.
प्रमुख शहरातील 19 किलोग्राम LPG गॅस सिलेंडरची कींमत
शहर किंमत
दिल्ली 1473.50
मुंबई 1422.50
कोलकाता 1544.50
चेन्नई 1603.00
डिसेंबर पासून आतापर्यंत 215 रुपयांनी वाढले घरगुती गॅस सिलेंडर दर
नोव्हेंबर मध्ये दिल्ली शहरात सबसिडी असलेल्या गॅस सिलेंडरची 594 रुपये किंमत होती. 1 डिसेंबर रोजी ही किंमत वाढून 644 रुपयांवर गेली होती. 15 डिसेंबर रोजी आणखी 50 रुपयांच्या वाढीसह ही किंमत 694 रुपयांवर गेली. 4 फेब्रुवारीला 25 रुपयांनी वाढून 719 रुपये झाली. यानंतर 15 फेब्रुवारीला पुन्हा सिलेंडरमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली. 25 फेब्रुवारीला 25 रुपये प्रति सिलेंडर वाढविण्यात आले. 1 मार्चला 25 रुपयांची वाढ करुन सिलेंडरची किंमत 819 वर पोहचली. त्यांनतर 1 एप्रिल रोजी 10 रुपयांची कपात करण्यात आली. अशाप्रकारे डिसेंबर पासून आतापर्यंत 215 रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडरवर वाढ करण्यात आली आहे.