हॉलीवूडचा अभिनेता ब्रॅड पीट आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अँजेलीना जोली यांच्या संदर्भात तेथील न्यायालयाने निकाल दिला आहे.
एकेकाळी मिस्टर अँड मिसेस स्मिथ या नावाने जोडी नंबर 1 असलेले हे जोडपे सध्या कमालीच्या संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. अँजेलीनाला 2016 मध्येच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
तेव्हापासून हा कायदेशीर संघर्ष सुरू आहे. यातील सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुले कोणाकडे राहणार हा? यांना सहा मुले आहेत. त्यातील तीन त्यांचे स्वत:चे तर तीन त्यांनी दत्तक घेतलेले आहेत.
विवाहसंबंधात कटुता निर्माण झाल्यावर जेव्हा कोर्टाची पायरी चढली जाते तेव्हा मुलांचा ताबा हा सगळ्यात गंभीर आणि तितकाच संवेदनशील मुद्दा ठरत असतो. तेथे न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागतो.
आताही न्यायालयाने हा निर्णय दिला आहे की ब्रॅड आणि अँजेलीना या दोघांकडे मुलांचा ताबा असेल. अर्थात, त्यांचा सगळ्यांत मोठा मुलगा आता 19 वर्षांचा आहे.
त्याला तो सज्ञान असल्यामुळे या निर्णयातून वगळण्यात आले आहे. मात्र, अन्य मुलांच्या संदर्भात हा निर्णय लागू राहणार आहे.
त्यामुळे ब्रॅड खूश असल्याच्या बातम्या आहेत. मात्र, अँजेलीना नाराज असल्याचीही चर्चा आहे. तिला योग्य पक्ष मांडण्याची संधी मिळाली नाही किंवा मुलांची साक्षही घेतली गेली नाही, असे तिच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, योग्यपणे सगळ्या पैलूंचा विचार केल्यावरच न्यायालयाने हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया ब्रॅडच्या वकिलाने दिली आहे.