रायबरेली – देशातील अनेक राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे तर काही राज्यात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून नियम जारी करण्यात आले आहे.
#RaebareliPolice: अब रायबरेली में चोरी छिपे दीवारों के सुराख दे दी जा रही है शराब, वीडियो वायरल। @raebarelipolice @Uppolice @myogioffice pic.twitter.com/g9Ptfr4YUh
— Rafiya Naz (@raafiyanaz) May 27, 2021
तरी सुद्धा अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. यातच बीयर विक्री करणाऱ्या दुकानाचा मुख्य दरवाजा बंद ठेवून भिंतीमधून दारूच्या बाटल्या विकल्या जात आहेत. ग्राहकांना दारू पुरवण्यासाठी भिंतीत होल तयार करण्यात आला आहे.
या माध्यमातून संध्याकाळी ७ नंतरही सर्रासपणे दारूची विक्री केली जाते. विदेशी मद्यासाठी २० ते १०० रुपये अधिक आकारले जात आहेत. तर बीयरच्या एका कॅन आणि बाटलीमागे २० ते ५० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोडले जात आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याच्या हा व्हिडियो सोशलवर तुफान व्हायरल झाला आहे.