मुंबई – मराठी अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ नुकतीच ‘कुणाल बेनोडेकर’ सोबत विवाहबंधनात अडकली आहे. सोनालीने आपल्या वाढदिवसादिवशी सोशल मीडियावरून आपण विवाहबद्ध झाल्याची सुखद वार्ता सर्वांना दिली. हा अत्यंत घरगुती विवाहसोहळा दुबईत झाला.
View this post on Instagram
या विवाह सोहळ्याला तिचे आणि तिचा झालेला नवरा कुणाल बेनोडेकरचे आई-वडील उपस्थित नव्हते. लॉकडाऊनमुळे लग्न लांबत चालल्याने त्यांनी हा विवाह सोहळा आटोपून घेतला. कुणाल बेनोडेकरसोबत सोनालीचा मागील वर्षी 18 फेब्रुवारीला साखरपुडा झाला होता. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये तिने परत एकदा आपल्या वाढदिवसा दिवशी सर्वांना सरप्राईज दिले.
View this post on Instagram
लग्नासाठी होणारा खर्च टाळून ही रक्कम कोविड विरुद्धच्या मदतनिधीसाठी देण्याचा निश्चयही या दोघांनी केला आहे. लग्नावेळी कुणालचे आईवडील इंग्लंडला होते तर सोनालीचे आई-वडील इकडे भारतात होते. त्यांनी ऑनलाइन या लग्नात सहभाग घेतला. खऱ्या अर्थाने हे ‘शुभमंगल ऑनलाइन’ झाले.
View this post on Instagram
सोनाली लग्नामुळे चर्चेत असताना तिच्या घरावरही चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर आलिशान घरावर रंगलेल्या चर्चेवर आता सोनाली कुलर्णीनेही आपले मत व्यक्त केले आहे. “राजमहल वैगेर असे काही नाही.. आमचे 2BHK Flat आहे. हो पण आम्ही सुखी निरोगी आणि समाधानी आहोत. त्यामुळे आमच्यासाठी हाच आमचा ‘महल’ आहे.” असं सोनालीने म्हंटलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशलवर चांगलीच व्हायरल झाली आहे.
View this post on Instagram
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तर ‘नटरंग’ या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. आणि तिला एक खरी ओळखल मिळाली.
View this post on Instagram