नवी दिल्ली – देशात जीवनावश्यक औषधे आणि ऑक्सिजन यंत्रणांसह सर्व अत्यावश्यक मालाच्या आयातीला त्वरित परवाने द्यावेत असा आदेश केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. शक्य तितक्या कमी वेळात हा माल सर्व गरजूंपर्यंत पोहचला पाहिजे असेही या बोर्डाने म्हटले आहे.
स्वत: बोर्डानेच ही माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वस्तुंच्या आयातीची तातडीची गरज लक्षात घ्यावी आणि त्या अनुरूप उपाययोजना करावी अशी सूचनाही बोर्डाने केली आहे. केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर औषधांच्या आयातीवरील सर्व आयात कर रद्द केला आहे. हे औषध तयार करण्यासाठी लागणारा सारा कच्चामालही आयात करातून वगळण्यात आला आहे. सध्या देशभर रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक संस्थांना त्याच्या आयातीचे परवाने हवे आहेत. त्या अनुषंगाने हा आदेश जारी करण्यात आला आहे.