हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक प्रेमकथा आहेत की त्यांची नावे ऐकून कोणाचा त्यावर चटकन विश्वास बसणार नाही. कारण त्यांच्यात कोणतेच साम्य नव्हते तरीही ते प्रेमात पडले आणि या अशा कथित प्रेमामुळे त्यांच्या आयुष्यात मोठी वादळेही आलीत. अशाच एका जोडीचे नाव सांगता येईल ते म्हणजे सुश्मिता सेन आणि विक्रम भट्ट.
View this post on Instagram
दस्तक हा सुश्मिताचा पहिला चित्रपट. ती नुकतीच विश्वसुंदरीचा किताब पटकावून भारतात आली होती. भट्ट कॅम्पने अगोदरच तिला हेरले आणि आपल्या चित्रपटाची नायिका करून टाकले. या चित्रपटाच्या सेटवरच विक्रम तिच्या प्रेमात पडला. तेव्हा तो 27 वर्षांचा तर ती 20-21 वर्षांची. विक्रम तेव्हा विवाहित होता व त्याला एक मुलगीही होती. मात्र हे प्रेम सेटवरून त्याच्या घरापर्यंत येऊन पोहोचले व त्याचा संसार विस्कटला. त्याने पत्नी आणि मुलीला सोडण्याचा निर्णय घेतला. इतकेच काय नंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.
View this post on Instagram
आज आता आयुष्याच्या या टप्प्यावर त्याला या सगळ्याचा पश्चाताप होतो. तो म्हणतो आज त्याला ती चूक वाटते. मात्र, याकरता ते वय दोषी होते. तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही भोगतात त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असतात. मी आज माझ्या मुलीला मीस करतो. मात्र, जर तेव्हा माझ्या हातून ती चूक झाली नसती तर आज जीवन वेगळे राहिले असते.
View this post on Instagram
आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत तो म्हणतो की त्याचे कारण सुश्मिता नव्हती. मात्र, माझा गुलाम हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना सुश्मिताचा बॉयफ्रेंड एवढीच माझी ओळख राहिली होती हेही तो सांगतो.