मुजफ्फरनगर – महिला अत्याचाराच्या घटना सामान्य असलेल्या उत्तर प्रदेशातून एका महिल्याच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपविल्याचं सांगण्यात येत आहे. विषेश म्हणजे आत्महत्या करतानाचा व्हिडीओ तिच्या महिलेच्या सासरच्या तयार केला आहे.
मुजफ्फरनगरमध्ये महिलेला गळफास घेत असताना तिच्या सासरच्या मंडळीने तिचा जीव वाचविण्याचऐवजी आत्महत्येचा व्हिडीओ तयार केला. सूनेचा जीव गेल्यानंतर त्यांनी मोबाईलचा कॅमेरा बंद केला. आत्महत्येचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. मृत सूनेच्या सासू आणि सासऱ्यांना अटक केली असून नवरा आणि अन्य सदस्य फरार आहेत. मृत महिलेचं नाव कोमल आहे.
कोमलचं लग्न दत्तियाना गावातील देवेंद्रशी झालं होतं. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींनी कोमलला हुंड्यासाठी मारहाण सुरू केली होती. सहा महिन्यापूर्वी तिला घराच्या बाहेर काढलं होतं. मात्र नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर कोमल सासरी गेली होती, असं कोमलच्या माहेरच्या मंडळीने तक्रारीत नमूद केलं आहे.
दरम्यान कोमलनं सततच्या त्रासाला कंटाळून रविवारी आत्महत्या केली. तिनं गळ्यात ओढणी बांधली, त्यानंतर काही वेळ विचार केला आणि गळफास घेत स्वत:ला पंख्याला लटकावून घेतलं, असं व्हिडीओमध्ये दिसतं. सासरची मंडळी दरवाजा तोडून कोमलचा जीव वाचवू शकले असते. मात्र त्यांनी कोमलला वाचविण्याऐवजी व्हिडीओ तयार केला.