मुंबई –सिनेसृष्टीतील हिरो नंबर १ म्हणजेच, प्रसिद्ध अभिनेते ‘गोविंदा’ यांनी कधीकाळी अनेक सुपर हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळखकनिर्माण केली आहे. ८० ते ९० च्या दशकात रुपेरी पडद्यावर गोविंदाच्या सर्वच चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. फक्त अभिनयच नाही तर त्यांची स्टाईल, डान्स अशा बऱ्याच गोष्टींमुळे लोक गोविंदाकडे आकर्षित होत होते.
दरम्यान, गेल्या काही काळापासून गोविंदा सिनेसृष्टीत फारसे दिसत नाही. याच कारण सुद्धा खास आहे. “आपल्या नेपोटिझममुळे काम मिळणं बंद झालं’. या बद्दल स्वतः गोविंदा यांनी कबुली दिली. तसेच सध्या चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी त्यामध्ये अनेक सेक्स सिन्स दाखवले जातात. अशाच काही ऑफर्स गोविंदाला देखील आल्या होत्या. मात्र त्यांनी त्याला सुद्धा नकार दिला. एका मुलाखती दरम्यान गोविंदा यांनी या गोष्टीचा खुलासा गेला आहे.
गोविंदा पुढे म्हणतात, “सेक्स सिन्स दाखवण्यापेक्षा पॉर्न फिल्मच बनवा, असं ते म्हणतात. नियमांमध्ये राहून आपण नेहमी काम केलं आहे, आपल्या नियमांपलिकडे न जाता काम करुन त्याच ताकदीवर आपण यश मिळवलं असल्याचं गोविंदाने सांगितलं. जास्त प्रमाणात बोल्ड सिन्स असलेल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्यावर गोविंदाने त्यांना नकार देणं योग्य समजलं.