नवी दिल्ली – यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. त्यामुळे सर्व संघांनी लगबग सुरु केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एम एस धोनीने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी नवीन जर्सी लॉंच केली आहे. त्यावर आता अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानी प्रतिक्रिया दिली आहे.
जडेजानी धोनी जर्सी लॉंच करत असलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एम एस धोनी जर्सी लॉन्च करताना दिसत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओवर रवींद्र जडेजाने प्रतिक्रिया देताना लिहले आहे की, माझ्यासाठी एल साइज तयार ठेवा. चेन्नई सुपर किंग्सच्या नवीन जर्सीमध्ये एक खास गोष्ट आहे.या जर्सीच्या खांद्यावर इंडियन आर्मी ड्रेसच्या रंगाचा कपडा वापरताना आर्मीला श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचबरोबर जर्सीच्या हाताच्या खालच्या बाजूला लाल रंग वापरला आहे. भारतीय लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीचे लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणार आहे.
सीएसकेने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये म्हणले आहे की, नवीन जर्सीमध्ये मोमबत्तीचा वापर केला गेला आहे . जे भारतीय लष्कराला श्रद्धांजली आहे. या व्यतिरिक्त टीम लोगोवर तीन स्टार जर्सी लावले आहेत. चेन्नई संघाचे खेळाडू सराव शिबिरात सहभाग घेण्यासाठी क्वारंटाइन मध्ये दाखल होत आहेत. यामध्ये ताजे नाव सुरेश रैनाचे आहे, जो सात दिवसाच्या क्वारंटाइनसाठी मुंबईत दाखल झाला आहे. मागील हंगामात सुरेश रैनाने सहभाग घेतला.