सातारा – जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण फलटण तालुक्यातील आहेत. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
तीन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये 67 वर्षीय पुरुष (कलेढोण, ता. खटाव), 42 वर्षीय पुरुष (माळेवाडी भुईंज, ता. वाई), 52 वर्षीय पुरुष (खोजेवाडी, ता. सातारा ) अशा एकूण तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने – 392370
एकूण बाधित – 63247
घरी सोडण्यात आलेले – 58705
मृत्यू – 1892
उपचारार्थ रुग्ण – 2650