वाघोली (पुणे) – आव्हाळवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंदाताई अशोक सातव पाटील यांची निवड झाली. याबद्दल वाघोली ग्रामस्थांच्यावतीने माजी उपसरपंच व वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र अण्णा सातव पाटील व वाघोली गावच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांच्या हस्ते मंदाताई सातव यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन काळे, अशोक सातव पाटील, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.