मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अखेर शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या हाती हा अहवाल लागला असून हिरेन यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
एका वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण, त्यांचा मृत्यू कसा झाले, हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.
याआधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसेच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खूण आढळली आहे. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचेही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच हिरेन यांच्या कुटुंबीयांनीही याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते.