वाघोली (पुणे) – येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वाघेश्वर मंदिर बुधवार (दि. 10) ते शुक्रवार (दि. 12) मार्च करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी दिली.
वाघेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिष्ठानच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा फलक मंदिर परिसरातील मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला असून प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, तसेच दर्शनासाठी शिवभक्तांनी आग्रह करू नये, असे आवाहन राजेंद्र सातव पाटील यांनी केले आहे.