महिला दिन : स्वारगेट पोलिस विभागाची जबाबदारी सुषमा चव्हाण यांच्याकडे

पुणे, –  जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पदी सुषमा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला दिनी एका सक्षम महिलेच्या हाती सूत्रे सोपवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला. सुषमा चव्हाण सध्या सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) म्हणून कार्यरत होत्या. सुषमा चव्हार यांच्या उकृष्ट कामगिरीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सुषमा चव्हाण 1987 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाल्या. त्यांनी पुणे,मुंबई, नवी मुंबई, गुन्हे अन्वेषण विभाग, गुप्तवार्ता प्रबोधिनी, लाच लूचपत प्रतिबंधक विभाग येथे कर्तव्य पार पाडले. शहरामध्ये विश्रामबाग,फरासखाना, कोथरुड, डेक्कन, भोसरी, गुन्हे शाखा, वाहतुक शाखा आदी ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केले. तसेच लष्कर व डेक्कन पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांना 2007 साली पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, 2010 साली गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपदींचे पदक तसेच 2020 साली उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.