गेंदीबाई चोपडा हायस्कूल व ज्यू. काॅलेजमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

पिंपरी – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार कांकरिया ,कोषाध्यक्ष प्रकाशचंद चोपडा यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्राचार्य विक्रम काळे , कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका अरुणा वाघमारे ,मुख्याध्यापिका मीरा कुलकर्णी,पर्यवेक्षक शशिकांत हुले , विभाग प्रमुख मीना मेरुकर ,शिक्षक प्रतिनिधी रामनाथ खेडकर यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सरस्वती पूजन करून प्रतिभावान महिलांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुगल मीट लिंकच्या साहयाने सहभागी करुन घेतले .

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्राचार्य विक्रम काळे यांनी आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा असून समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या कार्याला अभिवादन केले . जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व शिक्षिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाच्या निमित्ताने विदयालयातील कु. आरती नलावडे, कु.रविना खरात, कु.आरती कुबडे, चि. ओमकार डोंगरे, कु.पूजा महापुरे या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन मनोगते व्यक्त केली. तर श्रीकांत पाटील, मिना मेरुकर,धनश्री कांबळे, गजानन हरिदास या शिक्षकांनी आपल्या मनोगतातून स्त्री शक्तीच्या कार्याचा गौरव केला . सूत्रसंचालन संजीव वाखारे यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी रामनाथ खेडकर यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.