कराची – पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा बायोबबल सुरक्षेत जरी सुरू असली तरीही त्यातील कमतरता व कठोर निर्बंधाचा अभाव असल्याचेही समोर आले आहे.
मूळचा पाकिस्तानी असलेला मात्र, ऑस्ट्रेलियाकडून खेळत असलेला स्टार खेळाडू फवाद अहमद याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बायोबबलबाबत तयार करण्यात आलेल्या नियमांचे पालन त्याने केले नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. फवादला कोरनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धेतील एक लढत स्थगित करण्यात आली. यासाठी विविध संघांच्या मालकांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळालाच जबाबदार धरले आहे.