पूजा चव्हाण प्रकरणात आता लॅपटॉपवरून गदारोळ; भाजप नगरसेवकाने आरोप फेटाळले

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. मागील काही दिवसांत या प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे झाले. यामुळे शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता हे प्रकरण शांत होऊन चौकशी सुरू होईल, अस वाटत असताना आता पूजाच्या लॅपटॉपमुळे गदारोळ निर्माण झाला आहे.

पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप भाजपचे नेते आणि वानवडी येथील स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरल्याचा आरोप बीडच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगीता चव्हाण यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी धनराज घोगरे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीड पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे. पूजा चव्हानच्या मृत्यूप्रकरणात घटनास्थळी भाजप नगरसेवक धनराज घोगरे उपस्थित होते.

दरम्यान भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. “पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाइल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही”, असं स्पष्टीकरण धनराज घोगरे यांनी दिलं आहे.

घनटास्थळापासून माझे घर हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो. तिचं नाव पूजा आहे हे देखील मला माहित नव्हतं. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेणं हे माझं प्राथमिक काम होतं. ते करून पोलिसांना फोन देखील मीच केल्याचं धनराज घोगरे यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.