मेलबर्न – अमेरिकेची अव्वल मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. तिने या सलामीच्या सामन्यात लॉरा सेगमंडवर 6-1, 6-1 असा सरळ दोन सेटमध्ये अशी मात केली.
या सामन्यात सेरेनाने पहिली गेम गमावल्यानंतर दोन्ही सेटमध्ये वर्चस्व राखले. सेरेनाची बहीण व्हिनस विल्यम्सनेही दोन वर्षांनी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत पहिल्या फेरीत विजय मिळवला. तिने या सामन्यात क्रिस्टिन फ्लिफकेनचा7-5,6-2 असा पराभव केला.
करोनाचा धोका देशात कायम असतानाही ही स्पर्धा अखेर वेळापत्रकानुसार सुरू झाली. या स्पर्धेत मानांकित खेळाडूंना नवोदितांचे आव्हान राहणार असून आता पुरुष एकेरीत रॉजर फेडरर याच्या अनुपस्थितीत राफेल नदाल व नोवाक जोकोविच यांच्याकडे संभाव्य विजेते समजले जात आहे.
अंकिताला संधी…
भारताच्या अंकिता रैनाला कारकिर्दीत प्रथमच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीमध्ये अंकिता रोमानियाच्या मिहेला बुझार्नेकूसह खेळणार असून या दोघींना थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. भारताकडून ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणारी अंकिता पाचवी महिला खेळाडू ठरली आहे.