पुणे – कॅब बुक करण्यासाठी खिशातून मोबाईल बाहेर काढताच अल्पवयीन मुलाने मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना वाकडेवाडी येथील नवीन बस थांब्याजवळ घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी पराग कुलकर्णी (35,रा.रावेत) हे वाकडेवाडी येथील नवीन बस थांब्याजवळ कॅब बुक करण्यासाठी थांबले होते. त्यांनी बुकिंगसाठी खिशातून मोबाईल बाहेर काढताच, दुचाकीवरुन आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना बघणाऱ्या रिक्षा चालकांनी अल्पवयीन मुलांच्या दुचाकीचा नंबर टिपला होता.
या नंबरच्या आधारे पोलिसांनी दुचाकी मालकाचा शोध घेतला. तेव्हा त्याने शेजारी रहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी काही कामानिमीत्त दुचाकी पाहिजे असे सांगून ती नेली होती. मुलांची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोघाही अल्पवयीन मुलांनी शाळा सोडली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करत आहेत.