पुणे : पेट्रोलचे दर शतकी वाटचाल करत असताना केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डीझेल वरच्या अबकारी कर सवलतीची अपेक्षा पूर्ण फोल ठरली आहे. त्यामुळे पेट्रोल – डीझेल वरच्या अबकारी करत मोठी कपात करावी, अशी मागणी करत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन केले.
‘या सरकारची कामगिरी भारी, पेट्रोलने गाठली शंभरी !’, ‘मोदी सरकारला आता अर्ज, पेट्रोल डीझेलसाठी द्या कर्ज’ अशा घोषणा देत आंदोलन केले.
मागच्या वर्षाच्या सुरवातीला पेट्रोल चे भाव ७८ रुपयाच्या जवळपास होते. कोरोना काळात सर्वच व्यवहार थांबले होते. लॉकडाऊनमुळे वाहतूक पूर्ण बंद होती . त्या महामारीच्या काळात मोदी सरकारने पेट्रोल वरील अबकारी कर मोठ्या प्रमाणात वाढवला. त्या वाढीव कराची झळ आता सामान्य माणसास बसत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना आता करावा लागेल त्यामुळे ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी आप ने केली आहे.
आंदोलनात आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, संदीप सोनवणे, सैद अली, अभिजित मोरे, मनोज थोरात, नागनाथ गायकवाड, बाळु वाघमारे, विकास लोंढे,अमोल अडागळे, सर्फराज शेख,हरून शेख, अशोक धुमाळ, मोईन चौधरी, जमिल सय्यद, ज्ञानेश्वर गायकवाड, अश्रफ हुसेन, दीपक घोरपडे, अनंत कुलकर्णी, ऋषिकेश मारणे, सुरेश पारखी, सतीश यादव, तबरेश शेख, आकाश मुनियन, मोहनसिंग रजपूत, रवींद्र अदारकर, किर्तीसिंग चौधरी, आनंद अंकुश,आशुतोष शिपलकर, संदेश दिवेकर, असगर बेग, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.