Gold-Silver Price Today – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचे दर 132 रुपयांनी वाढून 48,376 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले. त्याचबरोबर तयार चांदीचे दर 2,915 रुपयांनी वाढून 68,410 रुपये प्रति किलो झाले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,844 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर वाढून 26.35 डॉलर प्रति औंस झाले. जागतिक शेअर बाजार आणि इतर बाजारात अस्थिरता असल्यामुळे सोने आणि चांदीच्या बाजारातही आगामी काळात अस्थिरता राहणार असल्याचे सांगितले जाते.
सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी पाळीवर असल्यानंतर दिर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांनी सोन्याची खरेदी करण्यास हरकत नाही असे बरेच विश्लेषक सुचवितात.