बंगळुरु – फ्लिपकार्ट आता मराठीत उलब्ध करण्याता आले आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची बोली भाषा आहे. फ्लिपकार्ट ऍप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक होणार आहे.
मराठी भाषेची भर घालणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि बोलीभाषेतील अनुभव देण्यासाठी 5.4 दशलक्षांहून अधिक शब्दांचे भाषांतर आणि लिपित लेखन (ट्रान्सलिटरेशन) करण्यात आले आहे.
भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या 2021 पर्यंत 75 टक्के असेल आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील फ्लिपकार्ट वापरकर्त्यांची संख्या 50 टक्क्यांहून अधिक असल्याने प्रादेशिक सेवांचा विस्तार वाढवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
फ्लिपकार्टचे टेक्नॉलॉजी ऑफिसर जयेंद्रन वेणुगोपाल म्हणाले, फ्लिपकार्टवर प्रादेशिक सेवांचा विस्तार करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग असून त्यामुळे ई-कामॅर्सचे लोकशाहीकरण होण्यास मदत होईल.