मुंबई – सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) कंपन्यांना कर्ज फेररचनांचे प्रस्ताव ऑनलाईन स्वरुपात सादर करण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने बडोदा बॅंकेने लघु उद्योग विकास बॅंकेशी (सिडबी) सामंजस्य करार केला आहे.
कोविड नंतरच्या परिस्थितीतून मार्ग काढणे एमएसएमई कंपन्यांना शक्य व्हावे, याकरीता सरकार व रिझर्व्ह बॅंकेने दिलासा देणारे अनेक उपाय योजले आहेत. 25 कोटींपर्यंत कर्ज घेतलेल्या व व आर्थिक तणावाखाली असलेल्या एमएसएमईंसाठी, आरबीआयने वन-टाइम रीस्ट्रक्चरिंग (ओटीआर) योजनेची मुदत मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे.
या पार्श्वभूमीवर बडोदा बॅंकेने ऍसेट रीस्ट्रक्चरींग मॉड्यूल फॉर एमएसएमइ (एआरएम-एमएसएमई) या वेब-आधारीत प्लॅटफॉर्मसाठी सिडबीसह करार केला आहे. एमएसएमईंना कर्ज फेररचनेचा प्रस्ताव स्वतः तयार करण्यासाठी, एआरएम-एमएसएमई हे स्वयंचलित / डू-इट-युवरसेल्फ (डीआयवाय) वेब पोर्टल उपलब्ध झाले आहे.
कर्जदार त्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन अर्जात बदल करू शकतील किंवा नवीन ऑनलाईन अर्ज पुन्हा सादर करू शकतील. बडोदा बॅंकेचे एमएसएमइ विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. राम यादव म्हणाले, या भागीदारीमुळे एमएसएमईंना वेळेची बचत साधून, सोयीस्कर सोल्युशन विनामूल्य मिळेल.