साउथ सुपरस्टार प्रभास आपल्या आगामी “राधे श्याम’चे अखेरच्या टप्प्यातील शूटिंग करत आहे. या चित्रपटाशिवाय प्रभासने “सलार’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रशांत नील करत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात प्रभाससोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री दिशा पाटणी काम करणार असल्याचे चर्चा आहे. असे झाल्यास चाहत्यांना पडद्यावर एक नवीन जोडी पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच दिशाकडूनही दुजोरा मिळालेला नाही.
View this post on Instagram
प्रशांत नीलने नुकतेच “केजीएफ चॅप्टर-2’चे शूटिंग पूर्ण केले आहे. आता तो आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. या चित्रपटासाठी रामोजी फिल्म सिटीमध्ये एक भव्य सेट उभारण्यात आलेला आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दिशा पाटणी सध्या “राधे’ या बिग बजेट चित्रपटात व्यस्त आहे. यात तिच्यासोबत सलमान खान मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे प्रभास पुढील वर्षभरात “सलार’ आणि “आदिपुरुष’चे शूटिंग करणार आहे.
View this post on Instagram