सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या तीन करोनाबाधितांचा गेल्या 24 तासांमध्ये मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली. जिल्ह्यात “पॉझिटिव्हिटी रेट’ घसरत असून गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये “रिकव्हरी रेट’ 94 टक्क्यांच्या आसपास आहे. ही बाब दिलासादायक असली तरी करोनाबळी रोखण्यात अजूनही अपयश येत आहे.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना नेले (किडगाव), ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव, ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, खडकी, ता. वाई येथील 77 वर्षीय पुरुष, अशा तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. करोना विषाणूने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1782 नागरिकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर 3.31 टक्के आहे.
जिल्ह्यात 88 नागरिक करोनाबाधित
जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 88 नागरिक करोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 53 हजार 832 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण दोन लाख 71 हजार 263 नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून “पॉझिटिव्हिटी रेट’ 19.84 टक्के आहे, तर “रिकव्हरी रेट’ 94.02 टक्के आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा दीड हजारांहून कमी झाली आहे. तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात शनिवार पेठ दोन, गोडोली एक, इतरत्र एक, शाहूपुरी तीन, संभाजीनगर, नवीन विकासनगर, गडकर आळी, पाटखळ, अंगापूर, महागाव, तासगाव प्रत्येकी एक, कराड तालुक्यात कराड शहर दोन, गोवारे, आगाशिवनगर, विंग प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात मल्हारपेठ, गुंजळी, मोरगिरी प्रत्येकी एक, फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात शुक्रवार पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीनगर प्रत्येकी एक, इतरत्र एक, कोळकी, वाखरी प्रत्येकी दोन, शिणगारे वस्ती, चौधरवाडी, बरड, तडवळे, सांगवी, चांभारवाडी, पाडेगाव प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात कलेढोण तीन, निमसोड दोन, पुसेगाव, कातरखटाव, वडूज, खातगुण, एनकूळ प्रत्येकी एक, माण तालुक्यात दिवड चार, पळशी, कासारवाडी, गोंदवले खुर्द प्रत्येकी दोन, म्हसवड, काळचौंडी, राऊतवाडी, जांभुळणी, मलवडी, किरकसाल प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात वाठार किरोली चार, जळगाव दोन, पिंपरी, कोरेगाव, रहिमतपूर, प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात बामणोली तीन, तापोळा, कुडाळ, म्हसवे, हुमगाव प्रत्येकी एक, वाई तालुक्यात ओझर्डे, पाचवड, रेणावळे प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात शिरवळ, लोणंद प्रत्येकी एक, इतर चार, असे 88 जणांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.