मुंबई – युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला आहे. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. या पुरस्कारासाठी तब्बल 7 कोटी रुपयांचे मानधन रक्कम देण्यात येणार आहे.जगभरातील सुमारे 140 देशांतील 12 हजारांहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, डिसले यांना मिळालेल्या पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रणजीतसिंह डिसले यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. @ranjitdisale तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय. pic.twitter.com/RaeaHwXP4P
— Raj Thackeray (@RajThackeray) December 4, 2020
“युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय.” या आशयाचे ट्विट राज यांनी केलं आहे.