मुंबई – विधान परिषदेवर शिक्षक आणि पदवीधर प्रतिनिधी निवडून देण्यासाठी पाच मतदारसंघांमध्ये मिळून मंगळवारी 63.89 टक्के मतदान झाले.
निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या जागांमध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वांधिक 82.91 टक्के मतदान झाले.
त्याखालोखाल पुणे शिक्षक मतदारसंघात 70 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात 61 टक्क्यांहून अधिक मतदान झाले.
नागपूर पदवीधर मतदारसंघात सुमारे 55 टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे 50.30 टक्के मतदान नोंदले गेले.
राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.