पुणे – शहरातील एका बडया बांधकाम व्यवसायीकाच्या घरी 6 लाख 70 हजार रुपयांची जबरी चोरी करण्यात आली. चोरी करणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यांच्या शोधार्थ बिबवेवाडी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी वसंतबाग सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी दोघा चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बांधकाम व्यवसायीकाच्या मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तेजस प्रविण दुगड(29) असे त्यांचे नाव आहे. फिर्यादी तेजस आणी त्याच्या भावाचा बंगला शेजारी शेजारी आहे. तेजस व त्यांचे कुटूंबिय कामानिमीत्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घरामध्ये एक चोरटा घुसला होता. त्याने वरच्या मजल्यावरील कपाटाच्या ड्रॉवर मधून 6 लाख 70 हजाराची रोकड चोरीली. ही रोकड त्याने एका बॅगेत भरली.
बॅगेसकट खाली उतरता येत नसल्याने त्याने ती बॅग वरुन खाली टाकली. मात्र ती नेमकी त्याच्या भावाच्या घराच्या व्हरांड्यात पडली. ही बॅग त्याच्या भावाच्या घरातील आचारी देवजी सोळंकी यांना सापडली. त्यांनी ती तातडीने तेजस यांची वहिणी मोनल दुगड हिला दिली. तीने ती घरामध्ये नेऊन ठेवली. दरम्यान बॅग खाली टाकणारा चोरटा त्यांच्या घरामध्ये आला. त्याने देवजी सोळंकी यांना माझ्या आत्याची बॅग तुमच्या घरात पडली आहे.
ती मला द्या अशी मागणी केली.देवजीने ही बाब मोनल यांना सांगितली. त्या बॅग घेऊन घराबाहेर आल्या. मात्र त्यांनी चोरट्याला बॅग हवी असेल तर तुझी ओळख सांग खात्री पटल्यावरच आम्ही बॅग देऊ असे सांगितले. यामुळे चोरट्याने त्यांच्या हातातील बॅग हिसकावत पळ काढला. मात्र त्याला मोनल यांचा चालक राऊत यांनी अडवले. चोरट्याने राऊतला हाताने मारहाण करत घराबाहेर पळ काढला. तेथे त्याचा एक