मुंबई – बॉलीवूडमधील स्टार जोडी तारा सुतारिया आणि आदर जैन यांच्या लग्नाबाबत काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगत आहे. परंतु या अफवा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
आदर जैन याचे निकटवर्तीय म्हणाले की, लग्नाबाबतच्या सर्व गोष्टी खोट्या आणि निरर्थक आहेत. आदर हा एक्सेल इंटरटेन्मेंटसोबत आपल्या आगामी “हॅलो चॉर्ली’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.
तारा आणि आदर हे दोघेजण एकमेकांना काही काळापासून डेट करत आहेत. या दोघांना अनेकवेळा एकत्रित स्पॉट करण्यात आलेले आहे. आदरचा भाऊ अरमान जैन याच्या लग्नावेळीही तारा सुतारिया उपस्थित होती.
View this post on Instagram
यातच तारा आणि आदर मालदीवला व्हॅकेशनसाठी एकत्र गेले असल्याची माहिती मिळतेय. अलीकडेच तारा सुतारिया आणि आदर जैनने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालदीवमधले फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं. तारा आणि आदरने वेगवेगळे फोटो शेअर केले आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आदर हा “हॅलो चॉर्ली’चे शूटिंग करत आहे. दुसरीकडे तारा ही “तडप’ आणि “एक व्हिलेन-2’च्या कामात व्यस्त आहे. “तडप’ हा “आरएक्स 100′ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. याचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहे. या चित्रपटातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान हा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तर “एक व्हिलेन-2’मध्ये तारासोबत जॉन अब्राहम, दिशा पाटणी आणि आदित्य रॉय कपूर आदी काम करत आहेत.