पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत एकूण 99 कॉपी बहाद्दर आढळून आले आहेत.
करोनामुळे मागील वर्षी परीक्षाच झाल्या नव्हत्या. यंदा करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्राची व्यवस्था केली होती.
दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू झाली असून ती 4 एप्रिल रोजी संपली. परीक्षांमध्ये यावर्षी कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब विद्यार्थ्यांनी केला असल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही संख्या खूप कमी आहे. गैरमार्गांना आळा घालण्यासाठी भरारी पथकेही नियुक्त केली होती.