नगर – हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयाचा निकाल 96.07 टक्के लागला असून, सर्वाधिक विद्यार्थी प्रथम श्रेणित आणि उच्चतम श्रेणीमध्ये आले आहेत.
विद्यालयात कैफ अयुब शेख हा. 86 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तर द्वितीय भुमिका बोरुडे 85.20 टक्के व इरम आसिफ शेख ही 84.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्याध्यक्ष अजीत बोरा, मानद सचिव संजय जोशी, सुनिल रामदासी व विद्यालयाचे अध्यक्ष प्रा.मकरंद खेर यांनी केले आहे.
उच्चत्तम श्रेणीत 16, प्रथम श्रेणित 57, द्वितीय श्रेणीत 21 विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केल्याचे मुख्याध्यापक विलास साठे यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांनी कठिण परिश्रम करुन परिस्थितीवर मात करुन मिळविलेले हे यश खरोखर अभिनंदनीय असल्याचे प्रा.मकरंद खेर यांनी सांगितले.
यासर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना त्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था हिंद सेवा मंडळाच्याच महाविद्यालयामध्ये प्राधान्याने करु, असे आश्वासन मानद सचिव संजय जोशी आणि अजित बोरा यांनी दिले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे माजी विद्यार्थी संघाने अभिनंदन केले आहे. तसेच शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.