पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे 93 वे वर्ष असून, यंदा त्याचे यजमानपद मराठवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या उस्मानाबादला देण्यात आले आहे. दरम्यान, नुकतंच 93 व्या साहित्य संमेलनाचे ऑफिशल थीम सॉंग रिलीज करण्यात आले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेकडून मागील अनेक वर्षांपासून संमेलन व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेरीस या मागणीला न्याय दिला असून, यंदाचे संमेलन घेण्याचा मान उस्मानाबादकरांना मिळाला आहे.