लोणी काळभोर -नवीन मुठा उजव्या कालव्याच्या कडेने कारमधून अवैध गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यात येत असल्याचे समजल्यावरून दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना रात्रगस्तीच्या पोलीस पथकाने पकडले. अंधाराचा फायदा घेऊन यातील दोघे पळाले. यावेळी 9 हजार रुपयांचे गावठी दारूचे 6 कॅन जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी लखन मुकिंदा पवार (रा. उरूळी कांचन, ता हवेली) आणि त्याच्या सोबत असलेली दोन अल्पवयीन मुले अशा तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार (दि. 13) मध्यरात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक राजू महानोर व चालक सत्यवान जगताप रात्रगस्त घालत होते. यावेळी राजू महानोर यांना कुंजीरवाडीहून लोणी काळभोरकडे रायवाडी येथील कालव्यावरील कच्च्या रस्त्याने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.
यावेळी दारूचे 6 कॅन सरकारी गाडीत ठेवले असल्याचे आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन लखन पवार व एक अल्पवयीन मुलगा गाडीसह पळून गेले. दुसरा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला समज देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे.