रांची – अमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने झारखंडमधील निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल हीची 82 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत एक सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल, एक डायग्नॉस्टिक सेंटर आणि दोन भुखंडांचा समावेश आहे.
झारखंड पोलीस आणि राज्याचा दक्षता विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ईडीने तपास सुरू केला होता व आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मनरेगा घोटाळ्यातून मिळालेली रक्कम सिंघलने लाटली होती.
तिने व तिच्या नातलगांनी वेगवेगळ्या बॅंकांमध्ये ही रक्कम ठेवली होती. वयाच्या केवळ 21 व्या वर्षी पूजा सिंघलला यूपीएससी परिक्षेत यश मिळाले होते. आता तिचा पती अभिषेक झा, चार्टर्ड अकाउंटट, खुंटीचा मुख्य अभियंता यांच्यासह आणखी काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे.