नवी दिल्ली – मलेशियाला पाठविण्यात येत असलेल्या मदत सामग्रीच्या विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागाने केलेल्या चौकशीत हे लोक आढळून आले. नवी दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र ही माहिती त्यांनी लपवून ठेवली होती.
नवी मुंबईत करोना विषाणूचा संसर्ग पसरवल्याबदद्ल नवी मुंबई पोलिसांनी फिलिपिनच्या 10 नागरिकांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना कोणतीही माहिती न देता हे 10 फिलिपिनी नागरिक 10 ते 16 मार्च दरम्यान वाशीतल्या मशिदीत राहिले होते. त्यातले सहाजण इतर ठिकाणी गेल्यानंतर 3 जण तिथेच राहिले होते. या तिघांना करोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. ही माहिती त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवली होती.
त्यांच्यामुळे वाशीतल्या 13 जणांना आणि नेरूळ मधल्या काही नागरिकांना करोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. यातल्या 68 वर्षाच्या फिलिपिनी नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला, तर दोघांना नागपाडा इथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.