अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 70 हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी 70 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 1.61 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्चाचा अंदाज आहे. हा अंदाज गेल्या वर्षीपेक्षा जेमतेम 3 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. 2019-20 चा भांडवली खर्च 1.56 लाख कोटी होता. 2018-19 च्या भांडवली खर्चापेक्षा हा 17.2 टक्‍क्‍यांनी अधिक होता.

प्रवासी वाहतुक, माल वाहतुक, फुटकळ अन्य स्रोतांमधील उत्पन्न आणि रेल्वे भरती बोर्डाच्या मिळकतीमध्ये 9.5 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याचा अंदाज अर्थसंकल्पामध्ये वर्तवण्यात आला आहे. 2020-21 च्या अर्थसंकल्पात नवीन लाईन बांधण्यासाठी 12,000 कोटी, गेज रूपांतरणासाठी 2,250 कोटी.  दुहेरीकरणासाठी 700 कोटी, रोलिंग स्टॉकसाठी 5,786.97 कोटी आणि सिग्नलिंग आणि टेलिकॉमसाठी 1,650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे,

या आर्थिक वर्षात रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी 2725..63 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या वर्षात 1,265 मेट्रीक टन वजनाच्या मालवाहतुकीची अपेक्षा आहे. हा अंदाज 2019-20 च्या अंदाजापेक्षा 3.4 टक्‍क्‍यांनी म्हणजे 42 मेट्रीक टनांनी अधिक आहे. प्रवासी वाहतुकीतून 61 हजार कोटी आणि मालवाहतुकीतून 1 लाख 47 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित धरले आहे.

वाहतुकीतून एकत्रित उत्पन्नाचा अंदाज 2019-220 च्या सुधारित अंदाज अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा 9.6 टक्‍क्‍यांनी वाढून 2,25,613 कोटी रुपये ठेवला आहे. अर्थमंत्र्यांनी 18,600 कोटी रुपये खर्चाच्या बंगळुरु उपनगरी Thपरिवहन प्रकल्पही प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्पाची तिकीटांची आकरणी मेट्रो सारखीच असेल.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.