नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढताना दिसत आहे. असं असलं तरी देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी जवळपास ७० टक्के कोरोनाग्रस्त हे केवळ १३ शहरांमध्ये आढळून आले आहेत. कोरोनाच्या हिटलिस्टवर असलेल्या या १३ शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे व पुणे या तीन शहरांचा समावेश आहे.
देशातील या १३ शहरांमधील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत माहिती घेण्यासाठी आज कॅबिनेट सचिवांनी या १३ शहरांच्या महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये कॅबिनेट सचिवांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी कोरोना संकट थोपण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्याचे देखील कळते.
कोरोनाच्या हिटलिस्टवर असलेली ही आहेत ती १३ शहरं
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या ७० टक्के रुग्ण हे मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदूर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या १३ शहरांमध्ये आढळून आले आहेत.