पिंपरी: जिल्हा रुग्णालयात करोना बाधित महिलेचा मृत्यू

पाच जणांना नव्याने लागण

पिंपरी (प्रतिनिधी): सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात दापोडी येथील रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय करोना बाधितमहिलेचा गुरुवारी (दि. 25) मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता दहापर्यंत जाऊन पोहचला आहे. रुग्णालयामध्ये आज आणखी पाच जणांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

बाधित रुग्णांमध्ये नवी सांगवीतील चार तरुणांचा समावेश आहे. 26 ते 31 वयोगटातील हे तरुण आहेत. त्याशिवाय, गणेश पेठ (पुणे) येथील 55 वर्षीय पुरुषाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, 14 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी दाखल करण्यात आले. पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतील हे रुग्ण आहेत.

रुग्णालयामध्ये सध्या 30 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 8 जण अत्यवस्थ असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण 30 जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडले आहे. 51 रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविले आहे. तर, एकूण 10 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.